पुणे महानगरपालिकेच्या, चंदूमामा सोनावणे रुग्णालयात, साधारण पाच ते दहा वर्षे वयाच्या बालरुग्णांची तपासणी करीत असताना त्यांच्या पालकांबरोबर, म्हणजे बहुतेक वेळा मुलांच्या आयांबरोबर घडणारा एक ठराविक संवाद असतो.
नकाबाच्या आडून बोलणारी आई, "मॅडम, आप इसको बोलिये ना, की अगर ये रोज LAYS और कुरकुरे खायेंगा, तो आप इसको सुई लगा देंगे"
मग मी विचारते, "क्यूँ , ये रोज ऐसी चीजे खाता है क्या ?"
तिचे उत्तर, "हां, ऐसेहीच करता है. सुनताच नहीं है. इसको कितनाभी समझाओ, लेकिन घरका बना हुवा खाना नहीं खाता. रोज LAYS और कुरकुरे खायेंगा. मानताच नही."
माझा प्रश्न, "इसको रोज LAYS और कुरकुरे, फुकटमें कौन देता है? या फिर आपकी खुदकी दुकान है क्या ?"
कसनुसं हसून तिचं उत्तर, "दुकान कहाँसे होंगी? और इसको फुकटमें कौन देगा? जिद करके, रोज पैसे लेता हैं"
माझा प्रश्न, "लेकिन इसको पैसे कौन देता है?"
तिचे उत्तर, "किसीसेभी लेता है. ज्यादातर इसके अब्बू, दादा, नहीं तो चाचा दे देतें हैं"
माझे उत्तर, "तो फिर ऐसा करो, कल इसके अब्बू, दादा और चाचा, इन तीनोको मेरे पास इधर ले के आ जाओ. मैं तीनोको सुई लगा देती हूं. बच्चेको सुई लगाने से उसकी ये आदत कैसे छूटेगी?"
मग ती बाई निरुत्तर होऊन निघून जाते.
"शक्यतो कुठल्याही पाकिटातलं काहीही खाऊ नका, मुलांच्या हातात पैसे देऊ नका, घरी बनवलेले ताजे आणि सकस अन्न कुटुंबातील सर्वजण खात जा" हे जवळजवळ प्रत्येक रुग्णाच्या पालकांना मी सांगत असते.
एके दिवशी सोनावणे रुग्णालयातील काम संपल्यावर, मी अगदी रमत-गमत पायीच घरी निघाले होते. माझ्या समोर काही अंतरावर साधारण नववी-दहावीत असावी अशी एक शाळकरी मुलगी, भराभरा चालत असलेली दिसली. तिच्या पाठीवर एक मोठ्ठे आणि अवजड दप्तर होते. केसाच्या दोन घट्ट वेण्या, रंगीत रिबीनीने वर बांधून, रिबिनीची मोट्ठी फुले केलेली होती. मुलगी शाळेच्या गणवेशात होती. तो गणवेश पुण्यातल्या एका नामांकित शाळेचा होता. त्यामुळेच, ती मुलगी मध्यमवर्गीय घरातली असावी असा अंदाज मी मनाशी बांधला. चालता-चालता मधेच, त्या मुलीने, एक पाकीट उघडून काहीतरी तोंडात टाकले आणि त्या पाकीटाचे वेष्टन रस्त्यावर फेकून दिले. शाळेत शिकणाऱ्या, चांगल्या घरच्या मुलीने ते वेष्टन असे रस्त्यावर फेकावे, याचा मला जरा जास्तच राग आला. तिला रागवावे आणि तिने रस्त्यावर टाकलेले ते वेष्टन तिलाच उचलायला लावून, कचराकुंडीत टाकायला लावावे, या उद्देशाने, मी भराभर पुढे चालत निघाले. पण ते वेष्टन कशाचे आहे हे पाहण्यासाठी प्रत्यक्षांत मीच ते उचलले आणि अचंबितच झाले.
ते वेष्टन होते गुटख्याच्या पाकिटाचे!
मला काय करावे ते सुचेना आणि मी जागच्याजागीच खिळून उभी राहिले. भानावर आले तोवर ती शाळकरी मुलगी माझ्या नजरेआड झालेली होती.
आपल्या भावी पिढ्या वेगवेगळ्या वेष्टनांच्या विळख्यांत अडकून गर्तेत जाणार अशी भीती मला राहून-राहून वाटत असते. निदान आपले स्वतःचे किंवा आपल्या घरातले एखादे मूल या विळख्यात अडकणार नाही, याची दक्षता आपणच घ्यायला नको का?