शिक्षण पद्धतीत लवकरात लवकर आमूलाग्र बदल व्हायला हवाच आहे. आपल्या देशची राजकीय परिस्थिती आणि नेत्यांची बौद्धिक पातळी लक्षात घेता, आपल्या शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल घडायला किती वर्षे जातीला कुणास ठाऊक.पण तो पर्यंत काय?
शिक्षण पध्दती किंवा शाळा कशीही असली तरी, पालकांनी आपापल्या मुलांना शिक्षणाची गोडी लावावी लागते. मुलांना हळू हळू करत प्रत्येक विषयातील पाठ्यक्रमाबाहेरचे व जरा कठीण असे थोडेसे काहीतरी शिकायला लावणे हे कुठल्याही सजग पालकाला शक्य आहे . पण बरेचसे पालक ते करत नाहीत व फक्त आपल्या शिक्षण पद्धतीला नावे ठेवत बसतात. अतिशय सोप्या अन बुद्धीला चालना न देणाऱ्या अशा सध्याच्या शालेय अभ्यासाचे स्वरूप लक्षात न घेता, आपल्या मुलांना अभ्यासाचा फार ताण आहे, अशा समजुतीत बरेसचे पालक असतात . दुर्दैवाने या समजूतीबरोबरच मार्क्स=हुषारी असे समीकरण कित्येक पालकांच्या मनात तयार झालेले असते . त्यामुळे मग मुलांच्या शिक्षणाचे outsourcing तत्परतेने 'tution classes' कडे केले जाते. या सगळ्यामुळे , ज्ञान मिळवणे व ते योग्य पद्धतीने वापरणे हा शिक्षणाचा मूळ हेतूच आजचे पालक विसरून चालले आहेत.
आजकाल बहुतेक मुले संगणक आणि मोबाईल, गेम्स खेळणे, apps वापरणे या कामांसाठीच सफाईने हाताळतातत. आपले मूल कशासाठी संगणक व मोबाईल याचा वापर करते आहे याची पालकांना कल्पनाच नसते . त्यामुळे या उत्तम साधनांचा अत्यंत निरुपयोगी कामांसाठी वापर होत आहे हे लक्षात न घेता, आपापल्या मुलांच्या स्मार्टनेसचे अवाजावी कौतुक पालक करत रहातात. ख़रेतर संगणक आणि इंटरनेटमुळे आजच्या मुलांसमोर ज्ञानाचे मुक्त भांडार खुले आहे. पण पालकांनी ते कसे वापरायचे हे शिकावे लागते व मुलांनाही ते शिकवावे लागते.
पालकांनी शिक्षणाशी संबंधित या सर्व बाबींचा विचार डोळसपणे केला पाहिजे.