पुण्याच्या पावसाळयात, मला कधीतरीच छत्री वापरण्याचा योग येतो . माझ्याकडे आधीची एक छत्री होती . ती जरा स्वस्तातली असल्यामुळे, तकलादू होती. त्यात जरा वारं भरलं, की ती उलटायची आणि मग भिजायला व्हायचं. उलटून-उलटून ती छत्री निकामी होऊन गेली. मागच्या महिन्यांत इथे सतत आठवडाभर फारच पाऊस होता. एक दोनवेळा पावसांत बाहेर जायला लागले आणि तेंव्हा छत्रीशिवाय माझी चांगलीच पंचाईत झाली . त्यामुळे मग मी नवीन छत्री घ्यायचे ठरवले. आता तरी अशी उलटणारी ही छत्री नको, म्हणून चांगली महागातली आणि मजबूत छत्री घेतली. पण मजा बघा , नवीन छत्री घेतल्यापासून पुण्यातला पाऊस गायब. त्यामुळे नवीन छत्री वापरायचा योगच नाही आलेला अजून!
तात्पर्य काय? छत्री कुठलीही आणि कितीही महागातली घ्या, अशी ना तशी, ती उलटणारच!
वा उत्तम \
उत्तर द्याहटवाआता नक्की पासून पडणार
धन्यवाद प्रशांत !
उत्तर द्याहटवा