रविवार, ५ फेब्रुवारी, २०१७

'निदानतज्ज्ञ'



माझे काका, डॉक्टर राम गोडबोले, १९६२ ते २००६ पर्यंत म्हणजेच त्यांच्या निधनापर्यंत सोलापूरच्या वाडिया हॉस्पिटलमध्ये कार्यरत होते. त्या काळी बरेचसे डॉक्टर M.B.B.S. अथवा L.C.P.S. होऊन जनरल प्रॅक्टिस करायचे. आजच्यासारखा स्पेशालिटी आणि सुपरस्पेशालिटीचा तो जमाना नव्हता. लंडनहून M.R.C.P. आणि ग्लासगो विद्यापीठातून D.T.M.&H. या पदविकेचे सुवर्णपदक मिळवून भारतात परतल्यानंतर थेट आपल्या जन्मगावी म्हणजेच सोलापूरसारख्या दुष्काळी जिल्ह्यात, जनरल फिजिशियन म्हणून त्यांनी स्वतःच्या कारकीर्दीस सुरुवात केली. परदेशातून उच्चशिक्षण घेऊन स्पेशालिस्ट प्रॅक्टिस करणारे माझ्या काकांसारखे एक-दोनच डॉक्टर त्या काळी सोलापूरच्या पंचक्रोशीत होते. त्यामुळे साहजिकच  सुरुवातीपासून डॉक्टर राम गोडबोले हे एक वलयांकित व्यक्तिमत्व होते. तसेच त्यांच्या कर्तृत्वाच्या जोरावर भविष्यातदेखील प्रतिथयश आणि नामवंत डॉक्टर म्हणून ते नावाजले गेले.

प्रतिथयश आणि नामवंत डॉक्टर म्हटलं की, दिमाखदार एसी गाडीतून हिंडणारे, ब्रँडेड कपडे वापरणारे, भरपूर बँक बॅलन्स, फार्महाऊस किंवा शेती असलेले, वरचेवर परदेशवाऱ्या करणारे, देशी-विदेशी कॉन्फरन्समध्ये भाषणं देणारे, अनेक पुरस्कारांचे मानकरी असलेले डॉक्टर, असेच चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहते, नाही का? आश्चर्य म्हणजे माझ्या काकांकडे यातले काहीच नव्हते. पण 'प्रतिथयश आणि नामवंत डॉक्टर' च्या माझ्या व्याख्येत बसणारे सर्व काही त्यांच्याकडे होते. ते एक उत्तम  'निदानतज्ज्ञ' आणि कुशल शिक्षक होते. त्यांचा अनुभव दांडगा होता. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशातील सोलापूरलगतच्या सर्व जिल्ह्यांमध्ये एक निष्णात डॉक्टर म्हणून त्यांची ख्याती होती. सोलापूरच्या 'डॉ. वैशंपायन  मेमोरियल मेडिकल कॉलेजचे' ते मानद प्राध्यापक असल्याने त्या कॉलेजमध्ये शिकत असलेल्या आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना ते 'मेडिसिन' या विषयाची लेक्चर्स द्यायचे. वाडिया हॉस्पिटलमध्ये आमची क्लिनिकल टर्म लागली की तिथल्या अवघड, आव्हानात्मक केसेस त्यांच्यासमोर मांडल्यानंतर त्यावर होणारी चर्चा व त्यायोगे केलेले वाचन यातूनही आम्हाला खूप शिकायला मिळायचे.  

काका-पुतणी या रक्ताच्या नात्यापेक्षा गुरु-शिष्या हे आमचे नाते अधिक घट्ट होते. त्यांच्या हाताखाली दोन-तीन वर्षे काम करण्याची संधी मिळणे, ही माझ्या वैद्यकीय करियरमधील सगळ्यांत भाग्याची गोष्ट आहे. योग्य वेळी, योग्य पद्धतीने आणि वाजवी खर्चात केलेल्या वैद्यकीय निदानाचे महत्त्व, या 'निदानतज्ज्ञ' गुरूने माझ्या मनावर ठासून बिंबवले. रुग्णाच्या सर्व तक्रारी शांतपणे ऐकून, व्यवस्थित वेळ देऊन रुग्ण तपासणे, त्या तपासणीतून सापडलेली लक्षणे, आणि आपले वैद्यकीय ज्ञान व अनुभव यांची सांगड घालून एक-दोन तात्पुरत्या निदानांपर्यंत (presumptive diagnosis) येणे, 'योग्य निदान' (correct and  final diagnosis) करण्यासाठी काही अत्यावश्यक चाचण्या लिहून देणे आणि त्या चाचण्यांचे अहवाल मिळेस्तोवर तात्पुरती औषधयोजना करणे, अशी त्यांची सविस्तर 'निदानप्रक्रिया' होती.  डॉक्टरने रुग्णाकडून खुबीने काढून घेतलेले त्याच्या तक्रारींचे नेमके वर्णन (History) आणि  रुग्णाची केलेली सखोल तपासणी (Medical examination),  यातच निदानप्रक्रियेतील नव्वद टक्के काम पूर्ण होत असते, असे ते नेहमी सांगायचे. त्यामुळे त्यांच्या निदानप्रक्रियेत सर्वात जास्त खर्च काय होत असेल तर तो त्यांचा वेळ आणि शास्त्रशुद्ध विचार. महागड्या वैद्यकीय चाचण्या आणि औषधे हा खर्च जवळजवळ नसायचाच. एखाद्या आव्हानात्मक केसमध्ये सहजासहजी 'योग्य निदान' होऊ शकत नसे. अशावेळी रुग्णाला पुढच्या काही तपासण्या ते लिहून देत. पण त्याचबरोबर,  स्वतः अगदी  शिकाऊ डॉक्टर असल्यासारखे वैद्यकीय पुस्तके व संदर्भग्रंथ काढून परत-परत वाचत. त्या काळात होणारी त्यांची प्रचंड तगमग योग्य निदान झाल्यावरच शांत होत असे. मग मात्र, एखादे जटिल रहस्य उलगडल्यावर शेरलॉक होम्सच्या चेहऱ्यावर जो काही भाव येत असेल, तशा छटा मला त्यांच्या चेहऱ्यावर दिसत. गोडबोले सरांच्या हाताखाली शिकलेल्या माझ्यासारख्या प्रत्येक विद्यार्थी-विद्यार्थिनीने हे अनुभवलेले आहे आणि त्यातूनच आमच्या वैद्यकीय शिक्षणाचा पाया भक्कम झाला आहे.  

त्या काळी, योग्य निदान करणे (Reaching  correct  and final diagnosis), हा वैद्यकीय शिक्षणातला अत्यंत महत्त्वाचा आणि अनिवार्य असा भाग होता. गोडबोले सरांसारखे अनेक उत्तम शिक्षक व 'निदानतज्ज्ञ' आमच्या पिढीला लाभले. योग्य निदान करण्याची ही कला गुरु-शिष्य परंपरेतून पुढे जात होती आणि अनेक 'निदानतज्ज्ञ' घडत होते. परंतु, त्याच काळातले आमच्याबरोबर किंवा थोडे पुढे-मागे शिकलेले बरेचसे व्यावसायिक, आज ज्या प्रकारे वैद्यकीय व्यवसाय करत आहेत ते बघितले की माझ्या अंगावर काटा येतो. आपल्या  शिक्षणाचा उपयोग करून योग्य निदान व उपचार करणे हे आपले कर्तव्य आहे, या शिकवणीचा माझ्या पिढीतल्याही कित्येक अलोपॅथी व्यावसायिकांना पूर्ण विसर पडलेला असावा, असे मला जाणवते. किंवा कदाचित त्या गोष्टींना त्यांच्या दृष्टीने फारसे महत्त्वच राहिलेले नाही. आपल्याकडे आलेल्या रुग्णावर स्वतःचा वेळ व बुद्धी खर्च न करता भरपूर चाचण्या व अनेक महागड्या औषधांवर रुग्णांना  पैसे खर्च करायला लावण्याची जणू अहमहमिका लागली आहे असे वाटते. अलोपॅथीव्यतिरिक्त इतर पॅथीच्याही अनेक वैद्यकीय व्यावसायिकांनी 'वैदिकोपचार', 'निसर्गोपचार', 'चिलेशन थेरपी', 'अरोमा थेरपी' अशा वेगवेगळ्या गोंडस नावांखाली जे काही घृणास्पद उद्योग चालवलेले आहेत, त्याबद्दल तर न बोललेलेच बरे. अशा व्यावसायिकांच्या कचाट्यात सापडलेल्या रुग्णाच्या आयुष्याची दोरी बळकट असेल तरच तो वाचतो. मात्र तसे नसेल तर आपला जीव आणि पैसे दोन्हीही गमावून बसतो. गंमत म्हणजे यांपैकीच अनेक व्यावसायिक हे लौकिकार्थाने 'वलयांकित, प्रतिथयश आणि नामवंत' झालेले आहेत. समाजातील सगळेच वैद्यकीय व्यावसायिक असे आहेत असे माझे मुळीच म्हणणे नाही. परंतु, सचोटीने आणि केवळ 'रुग्णहित' डोळ्यापुढे ठेऊन व्यवसाय करणारे तज्ज्ञ आज 'अल्पसंख्याक' होत चाललेले आहेत, हे मात्र खरे. 
  
आजच्या वैद्यकीय शिक्षणाची पद्धत आणि घसरत चाललेला दर्जा बघितला की मी विद्ध होते. बारावीनंतर लगेच MD/MS होता येत नाही. त्यामुळे नाइलाजास्तव विद्यार्थी साडेचार वर्षे कशीबशी काढतात आणि  एम.बी.बी.एस. कोर्स 'उरकून घेतात'. या काळात लेक्चर्स ऐकणे, आव्हानात्मक केसेस अभ्यासणे व त्यावर चर्चा करणे, असल्या 'फालतू' गोष्टींवर वेळ न घालवता MD/MS प्रवेश परीक्षेच्या क्लासेसचे मार्ग विद्यार्थी धुंडाळत असतात. त्यानंतरच्या  सुपरस्पेशालिटी अभ्यासक्रमांच्या प्रवेशपरीक्षा अधिकच अवघड असतात. आणि त्यांच्या तयारीसाठी वेगळे 'सुपर' क्लास असतातच. अशा या 'क्लासिकल' शिक्षणामध्ये ज्ञान मिळो ना मिळो, चांगली  'रँक' मिळणे अत्यंत महत्त्वाचे झालेले आहे. त्यामुळेच रुग्णाच्या आजाराचे 'योग्य निदान' होणे यासारख्या 'क्षुल्लक' गोष्टीला महत्त्वच राहिलेले नाही! 

आजचे हे विदारक चित्र पाहता, भविष्यकाळात गोडबोले सरांसारख्या डॉक्टर्सची दुर्मिळ प्रजाति नामशेष होईल की काय, अशी भीती मला भेडसावते. म्हणूनच,  'निदानतज्ञ' अशा एका सुपरस्पेशालिटी कोर्सचा समावेश वैद्यकीय शिक्षणप्रणालीत व्हायला हवा असे मला वाटते. तसे शक्य होईल अथवा न होईल. निदानपक्षी, मागच्या पिढीतल्या उत्तम गुरूंच्या तालमीत तयार झालेल्या 'निदानतज्ज्ञ' डॉक्टरांना हाताशी घेऊन, मीच 'निदानकला' या विषयाचा एखादा क्लास सुरु का करू नये? कशी वाटतेय कल्पना? 

४१ टिप्पण्या:

  1. Swatee khup chan lihile aahes. It's very true. Aajache students pahile ki khup tras hoto. Sakhol aabhyas karayachi bilkul tayari naste.

    उत्तर द्याहटवा
  2. So true. He was master of diagnosis. And today it is almost like ready reconoer of diseases. Lab test results and then match making of results with causes. वैद्य आणि नाडी परीक्षा हे नातचं नाहीसं झालंय.

    उत्तर द्याहटवा
  3. खूप भिडणारा लेख. खरंच असं काही सुरू करा.
    अप्पा मामांच्या आठवणी ताज्या झाल्या.
    I am sharing this on my wall.

    उत्तर द्याहटवा
  4. लेख अतिशय सुरेख!!! या विषयावर पुढे जाण्याची मोठी गरज आहे. वैद्यकीय क्षेत्रामध्ये सध्याचे वातावरण पाहता तू अशा बाबतींत पुढाकार घेतलास तर असंख्य लोक दिला देतील. या विषयावर मोकळेपणी चर्चाही होताना दिसत नाही ,अगदी सजग वैद्यकीय तज्ञांकडूनही. IMA कडून खरे तर याबाबतीत पुढाकार घेणे अपेक्षित आहे. अनावश्यक चाचण्या तसेच super specialist Doctor कडून दिले जाणारे महागडे उपचार. त्यामुळे हेाणारी मानसिक व आर्थिक पिळवणूक यांवर तुझ्यासारख्या समविचारी Doctors कडून उपाय सुचवावा अशी विनंती
    साधा Generic Medicines चा पर्यायही अद्याप वापरात येऊ शकत नाही. याबाबतीत करेल तेव्हढेच काम थोडे आहे. तू मांडलेल्या चांगल्या विचाराबद्दल धन्यवाद व शुभेच्छा

    उत्तर द्याहटवा
  5. Very True, Master of clinical diagnosis Dr R.A.Godbole.
    I am Surgical & Drug wholesaler i agree with your views.
    Khup Chan, mastach.......................................

    उत्तर द्याहटवा
  6. Very Nice... & Real one...
    Mala dadancha sahavas labhale...
    Tyamule mi svatahas khup bhagyavan samajto...
    Kiran Kolhapure, Solapur

    उत्तर द्याहटवा
  7. मी डॉ गोडबोले सरांच्या कडे एकदाच गेलो होतो पण मला आलेला अनुभव व लिहिलेले तंतोतंत खरे आहे.

    उत्तर द्याहटवा
  8. Really nice and real.I still remember my posting in Sir'unit.Now in my teaching to ug students I always mention about his methods.In 1982 he had diagnosed my enteric and treated.

    उत्तर द्याहटवा
  9. Swati madam....khup surekh lekh aahe...ek goshta halli patate ki unconditionally aaply samajachi seva karnare loka kami aahet...truly inspiring.

    उत्तर द्याहटवा
  10. Swati madam....khup surekh lekh aahe...ek goshta halli patate ki unconditionally aaply samajachi seva karnare loka kami aahet...truly inspiring.

    उत्तर द्याहटवा
  11. Very true. This lack of sincerity and carelessness is there is every profession and in medical field it altogether assumes more criticality as here one misjudgment could risk the life of person or could hamper is health and therefore there should be some solutions as suggested by you to resolve such issues.

    उत्तर द्याहटवा
  12. Heart touching article.I am experiencing the same attitude of engineering students as that of medical students,based on my 28 years teaching experience.

    उत्तर द्याहटवा
  13. In today's world doctors like Appamama are a diminishing tribe. I am so glad that you are carrying on his legacy as a mission. Very proud of you. May God bless you.

    उत्तर द्याहटवा
  14. खूप छान लिहिलं आहेस ग... 'निदानकले'वर प्रभुत्व असणारी अशी काही डॉक्टर मंडळी असतात, हेदेखील आजच्या सामान्य माणसांना ठाऊक नसेल. तुझ्यासारखे डॉक्टर्स आहेत तोवर तरी ही गोष्ट कळकळीने समोर येत राहील. गोडबोले सरांचा लौकिक मी घरच्यांकडून ऐकत आलेलीच आहे, त्याला पुन्हा उजाळा मिळाला. अशा खेदकारक बाबी अनेकांच्या मनात येत असतात, पण तू ते ब्लॉगमधून सगळ्यांशी बोलतेस हे विशेष.

    उत्तर द्याहटवा
  15. काकू, blog खूप छान आहे! 'त्यांच्या निदानप्रक्रियेत सर्वात जास्त खर्च काय होत असेल तर तो त्यांचा वेळ आणि शास्त्रशुद्ध विचार' ही ओळ खूप आवडली... आणि मी तुम्ही मांडलेल्या मुद्द्यांशी सहमत आहे.
    फक्त एक विद्यार्थिनी म्हणून मला सांगावसं वाटतंय की PG entrance exam मध्ये जे आकडेवारी आणि पूर्णतः पाठांतरावर अवलंबून प्रश्न विचारले जातात (ज्या गोष्टी शिक्षक स्वतः आम्हाला सांगतात की practically कधीच उपयोगाला येत नाहीत) ते वगळून जास्त clinical ज्ञान तपासणारे प्रश्न विचारायला हवेत. किमान त्या निमित्ताने तरी विद्यार्थी MCQ च्या मागे न लागता योग्य दिशेने अभ्यास करू शकतील.कारण तिथे rank मिळवणे हे पुढील career साठी विद्यार्थ्यांचे goal काहीही झाले तरी राहणारच आहे.
    P.S. निदानकलेवर class सुरु करण्याची कल्पनाही उत्तम आहे!

    उत्तर द्याहटवा
  16. Thanks for leadingw to read this article of yours. Great to know about Dr Godbole and the kind of dedication he displayed in his profession. Surprised to note that as in other streams... in medical as well it is more exam than learning... needs to change in probably every walk of life... but medicine is so very important and so more significant to change here... put across very nicely and so lucid...

    उत्तर द्याहटवा
  17. काकू, blog खूप छान आहे! 'त्यांच्या निदानप्रक्रियेत सर्वात जास्त खर्च काय होत असेल तर तो त्यांचा वेळ आणि शास्त्रशुद्ध विचार' ही ओळ खूप आवडली... आणि मी तुम्ही मांडलेल्या मुद्द्यांशी सहमत आहे.
    फक्त एक विद्यार्थिनी म्हणून मला सांगावसं वाटतंय की PG entrance exam मध्ये जे आकडेवारी आणि पूर्णतः पाठांतरावर अवलंबून प्रश्न विचारले जातात (ज्या गोष्टी शिक्षक स्वतः आम्हाला सांगतात की practically कधीच उपयोगाला येत नाहीत) ते वगळून जास्त clinical ज्ञान तपासणारे प्रश्न विचारायला हवेत. किमान त्या निमित्ताने तरी विद्यार्थी MCQ च्या मागे न लागता योग्य दिशेने अभ्यास करू शकतील.कारण तिथे rank मिळवणे हे पुढील career साठी विद्यार्थ्यांचे goal काहीही झाले तरी राहणारच आहे.
    P.S. निदानकलेवर class सुरु करण्याची कल्पनाही उत्तम आहे!

    उत्तर द्याहटवा
  18. डॉ. म्हणून आप्पामामांचा अनुभव नाही. पण ऐकले आहे.
    आजच्या मेडिकल प्रॅक्टिसविषयी तू स्वतः डॉ असून लिहिले आहेस, त्याचे कौतुक वाटले. नाही तर डॉ "Medical Ethics (!)" च्या गोंडस नावाखाली गप्प बसणं prefer करतात.

    उत्तर द्याहटवा
  19. Madam, Very true. Medical service has become business now. Even the antibiotics are to be given with exact dose so that the virus or bacteria should not be promoted. This is not the problem at national level, but a internationally considered thing. But so called famous doctors prescribes the dose as per their wish or many times even not required.
    Tests and unnecessary keeping even on ventilation are common things now. The bitter thing is that middle class and above can pay for this because they get reimbursement(time is wasted, tension all these are not considered here), but what about poor people? And I am speechless about the quality of govt hospitals.
    So the best diagnosis with minimum expenditure is today's need!
    But many times I feel doctors can diagnose well, but they push the patient in the 'dushtachakra' of test just for the sake welfare of other doctors to complete the 'chain'(open secrete)
    When I was reading your blog it reminded me the speeches of Dr.B.M. Hegde, I listened on youtube.
    So go ahead Ma'am, all the best!

    उत्तर द्याहटवा
  20. Hello Dr Bapat What you have described is a generation of doctors ( now extinct) who solved medical puzzles. I was fortunate to be taught by some such individuals in Grant Medical College. These teachers told us that being a doctor is like being a detective. You use your communications and observational skills to solve the case. Good history should not only set you on correct path of diagnosis but give you a fairly certain narrow range of diagnosis. There were no short cuts in the examination. It had to be unhurried and have all elements of inspection, palpation, percussion & ausculatation. Each step takes you nearer the diagnosis. In most instances, investigations should add only credence to your clinical diagnosis and confirm it. I remember one of them measuring the size of tiles in the clinic room, multiplying it by number of tiles and then correctly calculating patient's exercise distance limit! While it was intimidating to start with, I think I had the best clinical education from these so called 'Old styled Teachers'.
    In the days of diagnosing things with CT/MRI/ECHO/PET etc, we are loosing our natural detection ability. It is pity that students will never be exposed to Sherlock Holmes style medical diagnosis!

    उत्तर द्याहटवा
  21. धन्यवाद! आपली टिप्पणी वाचून मला एखाद्या गुरुबंधू अथवा गुरुभगिनीला भेटल्यासारखे वाटले. पण आपले नाव आणि कुठे कार्यरत आहात हे कळले नाही. ते कळवणे आपल्याला प्रशस्त वाटल्यास निश्चित कळवावे.

    उत्तर द्याहटवा
  22. Very apt write up about the great & best qualified Physician of Solapur, Dr. Godbole Sir.

    I have some golden memories associated with Sir.

    I was lucky to be called by Dr. Hemant ( his son) , for the special Sunday clinics for him ( & me - only two of us), during my third MBBS. (when Hemant was in 2nd MBBS)

    It helped me immensely, not only in my MBBS exams but also for my future career & I too, could finish my MRCPCH ( & DNB too) in first attempt, after about a gap of more than 25 years of my MD-Paed....!!

    I still remember his word & word of our clinics & his wonderful approach - especially the inspection part of clinical examination.

    He taught us how to be gentle, polite & respectful with the patient- How to work out the case with minimum investigations & as you rightly said, how to come to a correct diagnosis.

    A very very thorough Gentleman & a very sober living style.

    Such Geniuses & Gems are not to be found, now-a-days.

    Truly, a Master of Medicine...!!..

    My salute to this Greatest Teacher on this auspicious Teacher's day ...!!

    Thanks a ton to you, Dr. Swati for awakening so many wonderful memories associated with my beloved Teacher ...!!

    I am with you to serve as teacher ( with whatever I have gained from Godbole Sir) if you are planning to start " How to Diagnose" classes or something like that ...!!

    All the Bests...!!


    उत्तर द्याहटवा