अवचित आज सकाळी नवऱ्याने जेंव्हा ताजा लाल गुलाब माझ्या हाती दिला
व्हॅलेंटाईन डे! किती छान वाटलं मला, लाजत-लाजत मीही तो स्वीकारला
मी नाही रे आणला गुलाब तुझ्यासाठी, कसनुसं हसून मी त्याला बोलले
"राहू दे गं राणी, तू असताना गुलाब कशाला?" त्याच्या बोलांनी जरा सुखावले
माझी व्हॅलेन्टाईन मात्र यायची होती अजून, तिचीच तर प्रतीक्षा होती मला
ठरवत होते मनातल्या मनात, आज एक छानसं फूल द्यायलाच हवं तिला
त्याने दिलेले फूल, परत त्यालाच मी द्यावे, या अपेक्षेने नवरा होता बघत
फूल हातात घट्ट धरून, मी मात्र बसले होते माझी घालमेल लपवत
इतक्यात ती लांबूनच येताना दिसली, आणि माझ्याकडे बघून छानसं हसली
तिला पाहता किती बरं वाटलं म्हणून सांगू? निदान आजची तरी चिंता मिटली
नवऱ्याला सोडून मी गेले धावत, अन गुलाबाच्या फुलाने केले तिचे स्वागत
म्हणाले "बरं झालं आलीस बाई," ("लाग आता कामाला") हे मात्र होतं स्वगत
लाल गुलाबाने ती अगदी हरखून गेली, वेणीमध्ये फूल खोवून कामालाही लागली
नजरेनेच मी त्याला म्हणाले "तूच माझा प्राणसखा," पण व्हॅलेंटाईन मात्र कामवाली!
Wa. Mastt post aahe. Smita keskar mule kalle. Tai . Mi sharmila shirke/ jagtap. Dadanchi junior. Tu itake chan lihites mahitach navhate.
उत्तर द्याहटवाThanks!
उत्तर द्याहटवाI don't know... मी लिहायला लागलेय इतकेच!
Solid!!! �� ��
उत्तर द्याहटवाधन्यवाद श्रद्धा!
हटवाExcellent!!!Truely deserving valentine for every family!
उत्तर द्याहटवाShe has become indispensable member of
Every family! The difference is only very few
Acknowledge and give dignity to this deserving member!
very true Milind but when ? if she finds every now and then an opportunity to steal money from owner' pocket , cupboard . if she eats sweets fruits food from refrigerator without knowledge of owner. if she refuses to do extra work on occational day demands money. No they are money minded then how can they be our Valentine.
हटवाछान अभिप्राय मिलिंद!
उत्तर द्याहटवाबरेच दिवस वाचत्येय् तुझ्या posts, पण त्या फोनवर. तिथे comments देणं अवघड जात होतं. आत्ता computer वर मिळाली. व्हॅलेंटाईनची कल्पना छान.
उत्तर द्याहटवा