काल दि. २० फेब्रुवारी २०२२ च्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये छापून आलेल्या एका बातमीने माझे लक्ष वेधून घेतले. पूर्व लंडनमधील, हॅकने या भागात, २६ किंग एडवर्ड रस्त्यावर असलेल्या 'The Ayah's Home' या इमारतीला 'Blue Plaque' मिळाल्याचे ते वृत्त होते.
काही महत्त्वाच्या व्यक्तींचे भूतकाळात वास्तव्य असलेल्या इमारतींवरअशी 'Blue Plaque' किंवा निळ्या रंगाचा स्मृतिफलक लावण्याची पद्धत भारतातही आहे. पण, या 'The Ayah's Home' नावाच्या इमारतीला 'Blue Plaque' का मिळाली असावी? अशा कोण विशेष व्यक्ती त्या इमारतीमध्ये भूतकाळात वास्तव्यास होत्या? त्याबद्दल आणखी माहिती वाचल्यावर मला आश्चर्याचा धक्काच बसला.
'गोरे साहेब' आणि त्यांच्या मड्डमांनी भारतात कमालीचे ऐषोआरामाचे आयुष्य व्यतीत केले. इंग्लंडमधल्या नोकरांच्या पगाराच्या एक अष्टमांश पगारात भारतीय नोकर मिळत असल्याने, एकेका गोऱ्या कुटुंबाच्या दिमतीला, भारतीय नोकर आणि मोलकरणींचा मोठा ताफाच असायचा. हे ब्रिटिश साहेब-मेमसाहेब, उन्हाळ्याच्या सुट्टीत, किंवा सेवानिवृत्त झाल्यावर, इंग्लंडला परतताना भारतीय मोलकरणी म्हणजेच 'आया' आपल्याबरोबर इंग्लंडला नेत असत. तिथे गेल्यावर, काही कारणाने त्यांची सेवा नको असल्यास, ते दुसऱ्या एखाद्या गोऱ्या अधिकाऱ्याकडे त्यांना काम मिळवून देत, किंवा भारतात परत पाठवत असत. पण मोलकरणींना नीट न वागवणाऱ्या काही महाभागांनी त्या 'आयां'ना अगदी पगारही न देता, रस्त्यावर सोडून दिले होते. अशा अशिक्षित, निर्धन 'आयां'ना, अक्षरशः भीक मागून परतीच्या प्रवासासाठी पैसे जमा करावे लागत. कुठल्यातरी गलिच्छ वस्तीमध्ये, एकाच खोलीत अनेक 'आया' दाटीवाटीने राहून, कसेबसे दिवस कंठत असत.
इग्लंडमधील काही महिला सामाजिक कार्यकर्त्यांना, या 'आयां'च्या सामाजिक स्वाथ्याची समस्या लक्षात आली. अशा 'आयां'च्या आसऱ्यासाठी जागा मिळवण्याकरता काही संस्थांनी पुढाकार घेतला. प्रथम १८९१ साली, एलगेड ईस्ट लंडन मधील, ६ ज्युरी स्ट्रीट वरच्या एका घराचा ताबा लंडन सिटी मिशनने घेतला व तिथे 'The Ayah's Home' चालू केले. सन १९०० साली, पूर्व लंडनमधील, हॅकने नावाच्या भागात, २६ किंग्ज एडवर्ड रोड वर, तीस खोल्यांच्या एका प्रशस्त वास्तूत 'The Ayah's Home' हलवले गेले. निष्कांचन अवस्थेत मालकांनी सोडून दिलेल्या, परतीच्या प्रवासाची वाट बघत थांबलेल्या, किंवा किंवा प्रकृती अस्वास्थ्यामुळे प्रवासच करू शकत नसलेल्या, अशा अनेक भारतीय, चिनी, मलेशियन 'आयां'ना 'The Ayah's Home' ने आसरा दिला.
ज्या परकीय 'आयां'नी ब्रिटिशांची मुले-बाळे आत्मीयतेने सांभाळली त्यांच्या सेवेची सन्मानपूर्वक आठवण राहावी यासाठी, 'The Ayah's Home' ला 'Blue Plaque' प्रदान करण्यात आला. मला याचे खूप अप्रूप वाटले, आणि माझ्या वडिलांकडून अनेक वेळा ऐकलेल्या एका गोष्टीची प्रकर्षाने आठवण झाली.
माझी पणजी, म्हणजे माझ्या वडिलांच्या वडिलांची आई, कै. सौ. लक्ष्मीबाई नारायण गोडबोले, यांना वयाच्या चाळीशीतच, १९२७ साली, अर्धांगवायूचा झटका आला. त्यानंतरची सतरा वर्षे, म्हणजे, १९४४ साली मृत्यू पावेपर्यंत ती अंथरुणाला खिळलेली होती. तिच्या सेवेला गया नावाची एक मोलकरीण ठेवलेली होती. माझ्या पणजीचे मलमूत्राने खराब झालेले कपडे बदलणे, तिला अंघोळ घालणे, जेवण भरवणे अशी सगळी सेवा, गयाबाईने अत्यंत मायेने केली.
पणजीच्या निधनानंतरही, सुमारे १९५२ सालापर्यंत, गयाबाई माझ्या माहेरीच पगारी मोलकरीण म्हणून काम करीत राहिली. त्यानंतर मात्र तिला अंधत्व आल्यामुळे, आमचे काम सोडून ती आपल्या गावी, म्हणजे टेंभुर्णीला वास्तव्यास गेली. १९५८ सालापर्यंत, आमच्या कुटुंबियांना भेटायला ती अधून-मधून येत असल्याचे वडील सांगतात.
माझे पणजोबा, कै. नारायण रामचंद्र गोडबोले यांनी, १९५३ साली आपले मृत्युपत्र केले. त्यांच्या पत्नीच्या अखेरच्या काळात गयाबाईने केलेल्या सेवेबाबत त्यांनी त्या मृत्युपत्रात कृतज्ञता व्यक्त केली होती. तसेच, तिने केलेल्या सेवेच्या सन्मानार्थ, गयाबाईला दोनशे रुपये बक्षीस द्यावेत, अशी इच्छा त्यांनी लिहून ठेवली होती.
पणजोबांच्या मृत्यूनंतर, माझ्या वडिलांच्या काकांनी, टेंभुर्णीला जाऊन, ती रक्कम गयाबाईंना देऊ केली. पुढील काळात, गयाबाईंच्या टेंभूर्णीच्या राहत्या जागेवर अतिक्रमण झाल्याचे समजताच, ते हटवण्यासाठी माझ्या वडिलांनी न्यायालयात दावा लढवून, गयाबाईला तिच्या जागेचा ताबा मिळवून दिला.
आजदेखील सोलापूर-पुणे प्रवासात, टेंभुर्णी गाव जवळ आले की, गयाबाईची आठवण काढून तिचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख माझे वडील हमखास करतात. गयाबाईंने केलेल्या सेवेची आठवण माझ्या कुटुंबियांनी जागृत ठेवली याचा मला रास्त अभिमान वाटतो.
जुन्या जाणत्या मंडळीत अशी माणुसकी होती, त्यात घराण्यातील संस्कार पणं असतात, आणि अश्या व्यक्तींना मानसन्मान मिळतो तो त्यांचा या वागणुकीमुळे. ती दादा त्या पिढी आणि संस्कारातील आदर्श व्यक्ती आहेत
ReplyDeleteधन्यवाद!
Deleteखूप अभिमान वाटावा असे पूर्वज , वंशज गोडबोलेंच्या घराण्यात जन्मले.तुला वाटणारा अभिमान आणि भावना अत्यंत सार्थ आहेत. 👏👏👏
ReplyDeleteधन्यवाद!
Deleteखूप छान आणि माहितीपूर्ण लेख.मूळ लेखातील प्रसंग आपल्याही आयुष्यात कसे अनुभवायला मिळाले हे वाचताना खूप समाधान आणि आनंद वाटतो.खूप छान,
Deleteछान लिहिले आहे.
ReplyDeleteधन्यवाद!
Deleteखूपच सुंदर विचार व कृती
Deleteतसेच सादरीकरणही उत्कृष्ट
धन्यवाद सर!
Deleteछान आठवणी
ReplyDeleteधन्यवाद!
Deleteफारच ह्रदयस्पर्शी लिखाण आहे स्वाती.
ReplyDeleteधन्यवाद!
Deleteखूपच छान विचार. आणि हे सगळे दादान बरोबर राहून आम्ही पण अनुभवले आहे. दादा आमचे सीनिअर आहेत ह्याचा आम्हाला खूप अभिमान आहे.
ReplyDeleteधन्यवाद शर्मिला !
DeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteThanks Arvind!
DeleteKhoop masta lihile ahe!! You are an awesome doctor as well as a writer!!
ReplyDeleteLove,
Neha Tambekar
Thanks Neha!
DeleteGreat
Deleteखूप छान मॅम
ReplyDeleteधन्यवाद राजेश!
Deleteकामाप्रती समर्पण ठेवले की त्याचा योग्य सन्मान केला जातो हे पूर्वी घडायचे, आजकाल अशा भावना कमी होत चालल्या आहेत.
ReplyDeleteखरंय!
Deleteछान आठवण लिहिली आहे .....आईच्या वार्धक्य काळात सोलापूर आणि पुणे या दोन ठिकाणी तीच्या बरोबर राहिलेल्या अशा कामवाल्या मंडळीना आजही सन्मान पूर्वक वागवत आहे ....विनायक जोशी
ReplyDeleteधन्यवाद विनायक!
DeleteOh ...hruday sparshi...
ReplyDeleteधन्यवाद!
Deleteवाचली, छान आहे
ReplyDeleteस्वाती,दोन्ही संस्कृक्तीतला विरोधाभास छान व्यतीत झाला आहे,असे अनेक छोटे छोटे अनुभव आपलं आयुष्य समृद्ध करतात,तुझ्या पुढच्या लेखाची वाट बघत आहे.
ReplyDeleteअशा संपूर्ण पिढीची सेवा करणाऱ्या महिला आपल्या आधीच्या पिढीपर्यंत होत्या. तेव्हा प्रेम आणि आपुलकी होती, आर्थिक व्यवहार नंतर यायचा. आता आर्थिक व्यवहार महत्वाचा आहे, आपुलकी कमी झालीये. सगळंच बदलून गेलंय.
ReplyDeleteखुप छान लिखाण आणि आठवणी. आता फक्त पैसा बोलतो आहे. तेव्हा सेवेकरी महिला निःस्वार्थ भावनेने सर्व सेवा करत.कधी कधी ती व्यक्ती आपली घरचीच सदस्य आहे असे वाटत असे पण आता नाही.
ReplyDeleteVery nicely written, it shown ones gratitude for people who have worked for u with dedication & devotion especially for our/your respected elders in our family.
ReplyDeleteVery nice experience writing. Keep writing such amazing experiences.
ReplyDeleteधन्यवाद!
Deleteक्रुतज्ञता हा सर्वात मोठा गुण आहे.फार थोड्या ठिकाणी दिसतो. सुन्दर लेखन.
ReplyDeleteधन्यवाद!
DeleteSwati,really heart touching and inspiring.Dada's gratitude and work done for Gayabai gives us a lesson about his Humanity.Salute to him.
ReplyDeleteRajen.
Thanks Rajanji!
Deleteवर्षानुवर्षे इमाने इतबारे सेवा करणाऱ्या अशा कित्येक गयाबाई आपल्याला दिसतील पण त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणारे अगदीच बोटावर मोजण्याइतके... खूप छान शब्दात व्यक्त केलंय.
ReplyDeleteधन्यवाद!
DeleteSwatee,Great to know about your ancestors. Very touching and proud that I have a friend like you who is following the footsteps, even though the world is so much materialistic.
ReplyDeleteThanks Arvind!
Deleteछान अनुभव कथन केला आहेस ? असेच इतर विषयावर देखील लिहीत जा .माझ्या खूप खूप शुभेच्छा व मनःपूर्वक अभिनंदन.
ReplyDeleteधन्यवाद!
DeleteGood
ReplyDeleteधन्यवाद!
Deleteप्रतिकूल परिस्थितीत अतिशय निष्ठेने व प्रामाणिकपणे ज्यांनी आपल्याला मदत केली त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचे संस्कार जुन्या पिढीकडे होतेच.तसेच अशी उदाहरणे नवीन पिढीसाठी आदर्श व मार्गदर्शक असतील यात शंका नाही.. खूप छान, वास्तववादी व अद्वितीय लेखन..
ReplyDeleteधन्यवाद!
Deleteखूप interesting लेख स्वाती . नवीन माहिती मिळाली
ReplyDeleteकृतज्ञतेचे संस्कार फार महत्त्वाचे
धन्यवाद!
Deleteअभिमानास्पद..... काळाची गरज आणि नविन पिढीला आवश्यक असलेली शिकवण आहे या लेखात..... धन्यवाद !
ReplyDeleteधन्यवाद!
ReplyDeleteखूप छान लेखन. This information was totally unknown.
ReplyDeleteधन्यवाद हत्ते सर!
DeleteMast,
ReplyDeleteThanks!
Deleteपूर्वीचा सेवाभाव तसेच सेवाभावाची जाण ठेवुन वागणारी माणसे आता खूप कमी झालीयत. धन्य त्या गयाबाई आणि गोडबोले कुटुंबातील सदस्य. मृत्युपत्रात उल्लेख , पुढे केस लढणे. तसच या लेखात उल्लेख करुन जी कृतज्ञता जपलीय , हे सारच आनंददायी . लेखनही नेहमीप्रमाणे ओघवत व वाचनीय. धन्यवाद . मित्रगोत्री
ReplyDeleteधन्यवाद मित्रगोत्री!
Delete