संध्याकाळी घरी येत होते, तर वाटेत एक दोन मंडळांचे गणपती दिसले. गणपतीपुढे लाऊड स्पीकर वर हिंदी सिनेमातली 'बलम पिचकारी' किंवा तत्सम गाणी लागलेली होती. बऱ्याचशा शाळकरी मुला-मुलींचे तसेच तरूण-तरुणींचे पाय त्या गाण्यांवर थिरकत होते.
हल्ली जवळ जवळ बारा महिने कुठल्या ना कुठल्या सणाच्या निमित्ताने असं गाणं, बजावणं आणि पाय थिरकवणं चालू असतंच. तसेच वर्षभर, शहरातल्या तरूण मुला-मुलींचे हातही मला दिवसरात्र भरभर चालताना दिसतात, पण ते मुख्यत: हातातल्या मोबाईलवर!
हेच हातपाय जर, रोज थोड्या वेळासाठी का होईना, विधायक कामांसाठी चालायला लागले, तर लवकरच आपला देश प्रगतीपथावर लागेल. नाहीतर आपण निवांतपणे २०-२०च्या matches बघत, 'vision २०२० 'ची वाट इसवी सन ४०४० पर्यंत बघत बसू!
Agree with your core sentiments..
उत्तर द्याहटवाstill feel edgemore cynical touch in your reaction..
The concepts of fair/unfair ,positive / negative,good/bad are very relative unless of extreme deviations or of harm to others.
most of them imbibed by one's upbringing n environ in childhood..
lot more n complex factors make a person n personality..
Empathy can help one realize the other face of truth coin..
Yes. I agree. Sometimes I feel frustated to see the activities of young population in the urban areas.
उत्तर द्याहटवा