उमा बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल झाली त्याला दहा दिवस उलटून गेले. नेपाळच्या ट्रीप मध्ये, कुणा वेटरच्या चुकीमुळे उमा शेकोटीच्या ज्वालांमध्ये अचानक भाजली गेली. जवळजवळ ४२ टक्के बर्न्स आहेत असे कळतेय. ही बातमी समजल्यापासून मी बेचैन आहे. एकदा वाटले होते, लगेच उठावे आणि जावे मुंबईला. पण मी जाऊन तरी काय होणार? सध्या मलाच सर्दी खोकला आणि तापाने पछाडलेले आहे. माझ्या जाण्याने व भेटण्याने उमाला मदत होण्यापेक्षा जंतुसंसर्ग होण्याची शक्यताच जास्त आहे .
मुंबईतच हार्ट सर्जन म्हणून कार्यरत असलेला आमचा वर्गमित्र डॉ अजय चौगुले, नुकताच तिला भेटायला जाऊन आला. त्याने उमाच्या बोलण्याचा एक छोटासा video काढून आम्हाला पाठवलाय. उमा किती धीराची आहे म्हणून सांगू! त्या video मध्ये ती आम्हा वर्ग मित्र-मैत्रिणीना धीर देण्याचे काम करते आहे. तिच्या वेदना सहन करता करता बिचारी बोलते आहे, हे पाहून माझ्या मनाला फार यातना झाल्या. वैद्यकीय शास्त्र खूपच प्रगत झालेले आहे, तिला उत्तम उपचार मिळत आहेत, तरीही उमाची बातमी ऐकल्यापासून मन सैरभैर आहे .
उमा, तू लवकर बरी हो बरं, आणि पुन्हा पूर्वीसारखी मनमोकळी हसत रहा !

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा